एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान कार्ड ई-केवायसी
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.
तसेच १२ अंकी शिधापत्रिका (राशन कार्ड) आयडी तपासणीसाठी व पडताळणीसाठी आपण https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.
बेनिफिशिअरी लॉगिन चा वापर करून तुम्ही स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता
Client Name |
|
Client Company |
|
Project Start Date |
|
Project End Date |